ZP web site

वाशिम विषयी


वाशीमचे प्राचीन नाव वत्सगुल्म / वात्सुलग्राम आहे.यास बच्छोम, बासम असेही म्हणतात. इ.स.पूर्व सुमारे ३०० पासून येथे सातवाहन या राजवंशाची सत्ता होती.प्राचिन विदर्भात प्रशासकीय सोईसाठी दोन ठिकाणी राजधान्या करण्यात आल्या. एक म्हणजे वाशीम व दुसरे नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील 'नंदिवर्धन' (सध्याचे नगरधन. वाशीम येथे वाकाटकांची राजधानी होती. वाकाटकांचे साहित्यातील योगदान महत्त्वावाचे आहे. त्यांच्या काळात 'वत्सगुल्म'च्या परिसरात अनेक तीर्थक्षेत्रे होती. आजही,वाशीमचा बालाजी प्रसिद्ध आहे. येथे पद्मतीर्थ नावाचे तीर्थस्थानही आहे. त्यानंतर चालुक्यांचे राज्य आले. त्यांनी आपली राजधानी दुसऱ्या ठिकाणी नेली. त्यामुळे या शहराचे महत्त्व कमी झाले. त्यानंतर आलेल्या यादवांच्या राजवटीत पुन्हा या स्थानाचे महत्त्व वाढू लागले.

त्यानंतर इंग्रजांचे राज्यात वऱ्हाड हा मुलूख आल्यावर त्यांनी वाशीमला जिल्ह्याचे ठिकाण केले. परंतु, महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या १९०५ मध्ये झालेल्या पुनर्रचनेत हा भाग नजीकच्या अकोला जिल्ह्यास जोडण्यात आला. त्यानंतर २६ जानेवारी १९९८ मध्ये पुन्हा वाशीम हा जिल्हा घोषित करण्यात आला.